पसायदान परिसर बद्दल एकच शब्द सुचतो तो म्हणजे 'अविस्मरणीय परिसर '
नागपूर जवळ इतकी सुंदर जागा भटकंतीला आहे असे मला वाटले नव्हते .
ज्ञानेश्वर महाराजांची भव्य प्रतिमा अतिशय विलक्षण आहे.
परिसरात आत मध्ये शिरताच पसायदान एका भल्या मोठ्या दगडावर लिहिले आहे ते वाचून शाळा आठवली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांच्या प्रतिकृती पाहून इतिहास पहिल्या सारखे जाणवले .
नुकतेच 'तान्हाजी' चित्रपट पाहून आले होते म्हणूण 'सिंहगड' पाहण्याची आणि ज्या बाजूने तान्हाजी यांनी चढाई केली होती, गडाचा तो भाग बघून त्यांचा शौर्याला नमन करावेसे वाटले. किल्ले रायगडावरील 'हिरकणी बुरुज' ची प्रतिकृती अतिशय हुभेहूब खरंच वाटतो .
- दीपिका डोंगरे