श्री समर्थ रामदास

    
Total Views |
tuka_1  H x W:
गोदावरीतीरी मौजे जांब, परगणे आंबड येथे श्रीरामनवमीस रामदासस्वामींचा जन्म झाला. समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर, आई राणूबाई यांनी त्यांना रामनामाची गोडी लावली. त्यांच्या घराण्यात श्रीरामाची उपासना एकवीस पिढया चालत आलेली होती.
 
समर्थांनी ग्रंथराज श्रीदासबोध, मनोबोध, आत्मारामादि अध्यात्मग्रंथ, दोन कांडाचे रामायण, हजारो आरत्या, अभंग, विविधवृत्तात्मक श्लोक इत्यादी अफाट ग्रंथरचना केली.
 
सज्जनगडावर श्रीरामाच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसून त्यांनी आपली प्राणज्योत प्रभु रामचंद्रांच्या चरणकमली विलीन केली.
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे ।
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।