रण रागिणी राणी लक्ष्मी बाई

    
Total Views |
 
jhasi_1  H x W:
 
१९ नोव्हेंबर १८२८ - ०१ जून १८५८
लक्ष्मीबाई हयांना लहानपणी ‘मनु’ म्हणुन ओळखले जात. तलवारबाजी, निशानबाजी ह्यात ती लहानपणा पासुनच तरबेज होती.
 
१८४२ मधे लक्ष्मीबाईचा विवाह झांशीचे महाराजा गंगाधर रावांशी झाला आणि ती ‘राणी लक्ष्मीबाई’ झाली.
 
१८५७ चे उत्थान राणीच्या शौर्यानं गाजले. महाराज गंगाधररावांच्या मृत्यु नंतर राणी लक्ष्मीबाईनं झांशीच राज्य सांभाळलं.
इंग्रजांविरूद्ध तिनं धैर्यानं मुकाबला केला. इंग्रजांविरूद्ध लढत असतांनाच राणीवर चारही बाजुने हमला झाला, ‘‘मै मेरी झाॅंसी नही दुंगी’’ म्हणत घोडयाचा लगाम तोंडात धरून दोन्हीही हाताने तलवार चालवायला सुरवात केली. संध्याकाळी एका नाल्या जवळ घोडा अडला, तेव्हढयात एका इंग्रज टोपीकरानं राणीच्या डोक्यावर वार केला, राणीचा डोळा बाहेर आला. तरीही ती लढतच होती. अखेर रघुनाथसिंह देषमुख हयांनी राणीला घोडयावरून उतरवले आणि बाबा गंगादास हयांच्या झोपडीत आणले. तिथेच राणीनं आपले प्राण सोडले.