सहयाद्रीतील किल्ल्यांचे महत्व जाणणाऱ्या शिवरायांनी तोरण्याच्या किल्लेदाराला वश करून तोरणा ताब्यात घेतला. त्यावेळी शिवरायांचे वय होते केवळ १७ वर्षे. तोरण्याची दुरूस्ती करत असताना एका ठिकाणी खणताना सोन्याच्या मोहरांनी भरलेले २२ हंडे सापडले. या धनातून शिवरायांनी तोरण्याबरोबरच राजगडाचे बांधकाम सुरू केले. राजगडाला राजधानीचा किल्ला बनविताना शेजारचा तोरणा जणू या राजधानीचा रक्षक गड बनला. तोरण्याचे ‘प्रचंडगड’ असे नामकरण शिवरायांनी केले.