किल्ले राजगड

    
Total Views |
 
Rajgad_1  H x W
स्वराज्य स्थापनेची महत्वाकांक्षा बाळगून आणि सर्व साथीदारांना आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वाने आणि उच्च ध्येयाने भारून टाकून स्वराज्याचा श्रीगणेशा करण्यासाठी राजांची नजर पडली ती प्रथमतः तोरणा आणि मुरंबदेव किल्ल्यांच्या जोडीवर. तोरण्याचा ताबा घेऊन दुरूस्ती करत असताना जणू शुभशकूनच की काय म्हणूनच धनाने भरलेले हंडे तोरण्यावर सापडले. याच धनातून मुरूंबदेवाच्या डोंगराच्या माच्या बांधून, बुरुज उभारुन, तटबंदीने नटवून, दरवाज्यांचे अडसर घालून, कडे तासून आणि पाणी, इमारतीची सोय करून राजांनी कायापलट केला आणि नामकरण केले ‘राजगड’.
 
राजगड म्हणजे राजधानीचा गड आणि राजांचा खास गड. सातारा-पुणे महामार्गावरील नसरापूर फाटयापासून २० कि.मी. (पुण्यापासून ५० कि.मी.) अंतरावर काहीशा दुर्लक्षित भागात, सहयाद्रीतील बारा मावळांपैकी गुंजवणे मावळात असलेला राजगड सर्व बाजूंनी खोल दऱ्या , नद्या किंवा अवघड टेकडयांनी वेढलेला आहे.