किल्ले शिवनेरी

    

kii_1  H x W: 0 
 
जिजाऊंच्या पोटी महाराष्ट्रचा भाग्यसूर्य या गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्माला आला. गडावरील शिवाई देवीच्या आशीर्वादाने झालेल्या या बाळाचे नाव देवीच्या नावावरून ‘शिवाजी’ ठेवण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या सूर्यवंशातील शहाजीराजे आणि श्रीकृष्णाच्या यादव वंशातील जिजाऊ यांच्या या पुत्रात श्रीकृष्णाची राजनीती आणि श्रीरामाचा पराक्रम यांच्या झालेल्या अभूतपूर्व संयोगाने पुढे साऱ्या जगाला दिपवून टाकले. महाराष्ट्राचे भाग्यविधाते ठरलेल्या श्री शिवरायांचे वास्तव्य बालपणी या गडावर होते. स्थानिक कोळयांनी १६५० साली केलेला बंड करून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न मेागलांनी मोडून काढला आणि कोळयांना पकडून त्यांचा शिवनेरीच्या टेकडीवरील उंच भागी ‘‘कोळी चबुतरा’’ अथवा ‘‘काळा चबुतरा’’ येथे शिरच्छेद केला.
 
जुन्नर गावालगत असलेल्या सहृयाद्रीच्या लांबट आकाराच्या डोंगरावर आहे शिवनेरी किल्ला.